---Advertisement---

देशात अजूनही कोरोनाचे ७ लाख रुग्ण,पण बरं होण्याचे प्रमाण मोठे

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली,दि.२४ : आज आरोग्यमंत्रालयाने मेडिकल बुलेटीन जाहीर केले.यात ७० लाखापेक्षा अधिक रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. सध्या देशातील covid-19 बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्के आहे.तसेच मृत्यूचा दर हा १ पूर्णांक ५१ शतांश टक्के आहे,असे देखील यात नमूद करण्यात आले आहे. काल एका दिवसात ६७ हजार पेक्षा अधिक रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. देशात आतापर्यंत १० कोटीपेक्षा अधिक लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. काल एका दिवसात १२ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आले आहेत तर सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सात लाखांच्या आसपास आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!