---Advertisement---

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात मोठी चोरी ; लाखोंचे साहित्य लंपास

On: December 23, 2020 12:36 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड । भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात मोठी चोरी झाली आहे. कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी 22 डिसेंबरला परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन आणि एक वर्कशॉप गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये 17 ऑक्टोबर 2020 ला चोरी झाली. त्याची माहिती स्टोअर किपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक आणि लीगल इन्चार्ज जमीन शेख यांना कळवण्यात आली. त्यानंतर लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचं शटर उचकटल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

चोरीच्या या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य लंपास करण्यात आलं आहे. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. या प्रकरणात 22 डिसेंबर रोजी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा तपासाला सुरुवात केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!