---Advertisement---

महागाईची फोडणी ; सर्व प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

On: January 4, 2021 10:00 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई :  कोरोना काळात महागाईने आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असला आता खाद्य तेलाची महागाई सामान्यांचे घरगुती बजेट कोलमडून टाकणार आहे. सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या किमतींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे. महागाईच्या या फोडणीने सामान्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.

 

सोयाबीन तेलाचा दर 135 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला आहे. अवघ्या दोन महिन्यात सोयाबिनच्या दरात 35 रुपयांनी वाढ झाली आहे. सूर्यफुलाच्या तेलाची किंमत 145 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचली आहे. यंदा देशात सोयाबीन आणि कच्च्या तेलाची आयात 70 टक्क्यांवर गेलीय. केंद्र सरकारनं आयात खर्च वाढवल्यानं देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

त्याचबरोबर गरिबांसाठी आणि छोट्या व्यवसायिकांसाठी परवडणाऱ्या पामतेलामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. पामतेलाची किंमत जवळपास 120 हून अधिक झाल्यानं सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

 

खाद्यतेलाच्या किमती का वाढत आहेत?

भारतात सर्वसाधारणपणे 70 टक्के खाद्यतेल हे परदेशातून आयात केलं जातं. तर 30 टक्के भारतात तयार होतं. यंदा कोरोना संकटामुळं अन्य देशांमधून होणारी खाद्यतेलाची आयात ठप्प झाली होती. त्यातच केंद्र सरकारनं पामतेलावरील आयात शुल्क वाढवलं आहे. त्याचा परिणाम खाद्यतेलांच्या किंमतीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळं सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे उत्पन्नात घट झाली. त्याचा परिणामही खाद्यतेलाच्या निर्मितीवर झाला आहे.

 

किरकोळ बाजारातील तेलाचे दर (प्रति किलो)

– सोयाबीन तेल – १३५ रुपये

– सरकी तेल – 115 रुपये

– सूर्यफूल तेल – 145 रुपये

– पामतेल – 121 रुपये

– शेंगदाणा तेल – 160 रुपये

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!