---Advertisement---

ललित नर्सिंग केअरचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट येथे सर्व सोयींनीयुक्त असे ललित नर्सिंग केअरचे मोठ्या थाटात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
अक्कलकोट येथील गरीब जनतेला कमी खर्चात उपचार व्हावे या उद्देशाने आज ललित नर्सिंग केअर काढत असल्याचे  डॉ. भाग्यश्री मद्री _ बनसोडे यांनी सांगितले.त्या पुढे म्हणाल्या की, सर्वसामान्य जनतेला सोलापूर सारख्या ठिकाणी जाऊन उपचार घेणे शक्य नसल्याने आज आम्ही अक्कलकोट येथे ललित नर्सिंग केअर सुरू करीत आहोत याठिकाणी महिलांच्या सर्वप्रकारच्या आजारावर उपचार करण्यात येणार आहे.

यासोबत वंद्यत्व निवारण, स्त्री रोग चिकित्सा व शस्त्रक्रिया, प्रसुती पूर्व प्रसूतीपश्चात तपासणी, सोनोग्राफी व्दारे तपासणी,कुटुंब कल्याण केंद्र, दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया, सुलभ प्रसूती आशा प्रकारे विविध सेवा देण्यात येणार असल्याचे सांगितले.अक्कलकोट येथे सर्व सोयींनी युक्त असे ललित नर्सिंग केअरचे मोठ्या थाटात कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून देवस्थानचे अध्यक्ष महेश  इंगळे उपनगराध्यक्ष यशवंत  धोंगडे, डॉ रवींद्र बनसोडे, रिपाइं तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे प्रा.राहुल रुही, सिद्धार्थ सोशल फौंडेशन अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे , भाजपा अनु.जाती तालुकाध्यक्ष निजप्पा गायकवाड, अनुलोमचे राजकुमार झिंगाडे,भाजपा ता.अध्यक्ष मोतीराम राठोड, प्रकाश पाटील, धनंजय गाढवे, गौतम बाळशंकर,अपु पराणे, नागेश होटकर, अमोल पुटगे, माजी नगराध्यक्ष भागेश्री मोरे मा.नगरसेवक गंगाधर मोरे, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!