---Advertisement---

अक्कलकोट तालुक्यात सात गावात अंगणवाडी सेविका पदांची भरती

On: September 24, 2021 10:30 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यातील सात गावात सध्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी दिली.

यात सेविका पदासाठी किरननळी,अरळी, कलहिप्परगे, व.ना. तांडा येथे, मिनी सेविकासाठी नाविदगी येथे तर मदतनीससाठी बणजगोळ, नागोरे येथे
या जागा भरल्या जाणार आहेत.

या गावात प्रशासनाकडून भरती प्रकिया सुरू होणार असून यात मदतनीस पदासाठी किमान अहर्ता ७ वी पास असून सेविका पदासाठी किमान अहर्ता ही १० वी पास असणे गरजेचे आहे.अर्जदार हा संबंधित गावातील महिला अर्जदार असावा.

सदर गावातील इच्छुक अर्जदार यांनी विहित नमुन्यात आपल्या सर्व कागदपत्रासह बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, पंचायत समिती आवार अक्कलकोट येथे दि.३० सप्टेंबर ते दि.१४ ऑक्टोबर या काळात अर्ज सादर करावा,असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!