---Advertisement---

शिवशाही बसची काच फोडल्याप्रकरणी अक्कलकोट आगाराचे दोन कर्मचारी निलंबित

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट आगारात शिवशाही एसटी बसची काच फोडल्याप्रकरणी आगारातील दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

२९ नोव्हेंबर रोजी अक्कलकोट बस स्थानकावर पुणे विभागाची शिवाजीनगर आगाराची एम. एच. ०६ बीडब्ल्यू ०१९४ ही बस अक्कलकोट बसस्थानकामध्ये थांबली असता दोघांनी सदर बसच्या डाव्या बाजूला वाहकाच्या पाठीमागील खिडकीला दगड मारून दोन काचा फोडल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी वाहक जगदीश ख्याले व चालक सुभाष पवार यांच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून अक्कलकोट आगार प्रमुखांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर हे निलंबन झाल्याने या प्रकरणाची सर्वत्र सुरू आहे. चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!