---Advertisement---

नीरज चोप्राने घडवला इतिहास ; टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला मिळवुन दिला सुवर्ण पदक…

Follow Us:
---Advertisement---

टोकियो : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकुन भारताचा पदकाचा दुष्काळ संपवल आहे. त्याने पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. दरम्यान, अॅथलेटिक्स प्रकारात भारतीय खेळाडूने जिंकलेले हे पहिलं पदक आहे.

नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर लांब भाला फेकला. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने आपलाच विक्रम मोडला. त्याने 87.58 मीटर लांब भाला फेकला. पुरूष भालाफेकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले. तर चेक रिपब्लिकचा जाकुब रोप्य पदकाचा मानकरी ठरला. तर चेक रिपब्लिकचा दुसरा खेळाडू वेसलीला कास्य पदक मिळालं. पाकिस्तानचा अर्शद नदीम 5व्या स्थानावर राहिला.

याआधी अशी कामगिरी कोणत्याही भारतीय अॅथलीटला करता आलेली नाही. तसेच २००८ ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा याने नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकलं होते. यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!