---Advertisement---

कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रस्तावित नवीन योजनेसंदर्भात आढावा बैठक

Follow Us:
---Advertisement---

मुंबई :  कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रस्तावित योजनेसंदर्भात सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार,  उपसचिव का.गो.वळवी, पणन संचालक सतीश सोनी,  व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार, सहसंचालक विनायक कोकरे, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण, विक्रीयोग्य उत्पादनांच्या प्रभावी हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी विपणनाच्या पायाभूत सुविधांचा विकास, शेतमालाची साफसफाई, प्रतवारी करुन तात्पुरती साठवणूक, फळे, भाजीपाला व फुले यासारख्या नाशवंत मालाचे आयुष्य व दर्जावाढ, काढणी-पश्चात आणि आणि हाताळणी दरम्यान होणारे नुकसान कमी करुन अंतिमत: शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे, बाजार समितीसाठी नविन उत्पन्नाचे स्त्रोत निर्मिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!