---Advertisement---

चपळगावात उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन, सरपंच उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त उपक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१६ : चपळगावचे सरपंच तथा उद्योजक उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त उद्या (रविवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता चपळगाव येथे उमेश पाटील मित्र मंडळाच्या वतीने गरजूंना संसारोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी उपसरपंच डाॅ. अपर्णा बाणेगांव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेश पाटील, स्वामी समर्थ कारखान्याचे माजी संचालक बसवराज बाणेगाव, ग्रा.पं.सदस्य श्रावण गजधाने, गंगाबाई वाले, चित्रकला कांबळे, मल्लिनाथ सोनार, धनश्री वाले, स्वामीनाथ जाधव, गौराबाई अचलेरे, रेश्मा तांबोळी, वंदना कांबळे, सुवर्णा कोळी, वर्षा भंडारकवठे, उपाध्यक्ष सुभाष बावकर, तम्मा गजधाने, ज्ञानेश्वर कदम, सुरेश सुरवसे, दिगंबर जगताप, सुभाष बिराजदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!