---Advertisement---

सरपंच उमेश पाटील यांचा एस.बी प्रतिष्ठान व बाणेगाव मित्रपरिवाराच्यावतीने सत्कार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१७ : चपळगावचे सरपंच तथा मनीषा ऍग्रोचे प्रमुख उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चपळगाव येथे एस.बी प्रतिष्ठान व बाणेगाव मित्र परिवाराच्यावतीने जंगी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बसवराज बाणेगाव यांनी पुढील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

रिणाती स्कुलच्या प्रांगणात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याला सिद्धाराम भंडारकवठे ,
रियाज पटेल,अंबणप्पा भंगे, सुरेश सुरवसे, प्रकाश बुगडे, ज्ञानेश्वर कदम,कुमारप्पा पाटील, अभिजित पाटील, एस.बी. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओमराजे बाणेगाव, तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील,उपाध्यक्ष तममा गजधाने, सुभाष बावकर, परमेश्वर वाले, विलास कांबळे, मल्लिनाथ सोनार, गणेश कोळी,विश्वजित कांबळे, शशिकांत पाटील, परमेश्वर भुसणगे आदींची उपस्थिती होती.

सरपंच उमेश पाटील यांनी चपळगाव येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत म्हणून चपळगाव ग्रामस्थांच्यावतीने हा सत्कार सोहळा होता. त्यांना पुढील कामासाठी बळ मिळावे म्हणून हा सत्कार आयोजित केला होता,असेच कार्य त्यांनी गावासाठी पुढे करत राहावे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बसवराज बाणेगाव यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!