---Advertisement---

देवस्थानच्या सेवेकऱ्यांना स्वेटरचे वाटप महेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त अरुणभाऊ लोणारी यांचे उपक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमीत्त कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुणभाऊ लोणारी यांच्या वतीने वटवृक्ष देवस्थानच्या महिला सेवेकऱ्यांना स्वेटरचे वाटप महेश इंगळे व अरुणभाऊ लोणारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी अरूण भाऊ लोणारी बंधू व कोळी समाज बांधव यांच्या वतीने अरूण भाऊ लोणारी यांनी महेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमीत्त शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व वाढदिवसाच्या शुुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना अरूण लोणारी यांनी महेश इंगळे हे सर्वांच्या सुख – दुःखात मनोभावे सहभागी होणारे व्यक्तीमत्व आहेत . कोळी समाजाच्या विविध सामाजिक उपक्रमांना त्यांचा नेहमीच सहकार्य लाभतो. देवस्थान कर्मचारी व सेवेकऱ्यांच्या अडीअडचणीत त्यांचा नेहमीच मदतीचा हात पुढे असतो. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून त्यांच्या वाढदिवसानिमीत्त देवस्थानच्या महिला सेवकांना स्वेटरचे वाटप आज येथे करण्यात आल्याचे मनोगत व्यक्त केले.

यावेळी ऋषिकेश लोणारी, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, प्रा. शिवशरण अचलेर, विपुल जाधव, रवी मलवे, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, विश्वास शिंदे, प्रथमेश इंगळे इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – देवस्थान सेवेकऱ्याना स्वेटर वाटप करताना महेश इंगळे, अरुणभाऊ लोणारी व अन्य दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!