---Advertisement---

कन्नड साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सोमशेखर जमशेट्टी, बेंगळुरूत अधिकृत घोषणा

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट ,दि.२५ : कन्नड साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी युवा साहित्यिक, आदर्श कन्नड बळग महाराष्ट्राचे सचिव सोमशेखर जमशेट्टी यांनी बहुमताने विजय संपादन करून बाजी मारली.कन्नड साहित्य परिषद मुख्यकार्यालय बेंगळुरू येथे निवडणूक निर्णय अधिकारी जी.एम. गंगाधर स्वामी बुधवारी अधिकृत घोषणा करून त्यांना प्रमाणपत्र वितरण केले.आदर्श कन्नड बळग महाराष्ट्रचे सचिव सोमशेखर जमशेट्टी आणि मैंदर्गीचे नाट्य कलाकार मल्लिकाजप्पा मड्डे यांच्या मध्ये दुरंगी लढत झाली . २४ नोव्हेंबरच्या मतमोजणीत सोमशेखर जमशेट्टी यांनी ७३ मतांच्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.राज्यातील एकूण ८५० मतदारांपैकी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, जत, मिरज सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि उदगीर या राज्यातील एकूण ५२८ मतदारांनी मतदान बजावले.सोमशेखर जमशेट्टी यांना २९८ मत पडले तर त्यांचे प्रतिस्पर्धी मल्लिकाजप्पा मडडे यांना २२५ मत पडले.

निवडणुकीत यश मिळण्यासाठी मलिकजान शेख, प्रचार प्रमुख शरणप्पा फुलारी, उपाध्यक्ष बसवराज धनशेट्टी, राजशेखर उमराणिकर, विद्याधर गुरव, सुभाष बेळळुब्बी, गुरुबसू वागोली, गिरीश जकापुरे, कलमेश अडळटटी, धरेप्पा तोळणूरे,बसवराज
उणणद, शिवराज बिराजदार,बसवेश्वर करजगी,कल्याणी गंगोंडा,दिनेश थंबद, शरणू कोळी,विश्वेश्वर मेटी, विठ्ठल मणूरे,अमृता शेट्टी,दिनेश शेट्टी,मल्लिकार्जुन बडीगेर,निलप्पा कौंटगी,चिदानंद मठपती,बसवराज गुरव आदींनी
प्रयत्न केले.

कन्नड भाषिकांना आनंद

जमशेट्टी यांच्या विजयाने महाराष्ट्रातील सर्व कन्नड भाषिकांना आनंद झाला आहे. कन्नड भाषा, साहित्य आणि संस्कृती आणि कन्नड भाषा समृद्ध मजबूत होवो. हा विजय प्रामाणिकपणा आणि आदर्शवादाचा विजय आहे.पाठिंबा देणाऱ्या सर्व कन्नड भाषिकांचे मनःपूर्वक आभार – मलिकजान शेख,अध्यक्ष, आदर्श कन्नड, महाराष्ट्र

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!