---Advertisement---

उद्या ( मंगळवारी) दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ;शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक – नवाब मलिक

Follow Us:
---Advertisement---

मुंबई दि.६ डिसेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवार दिनांक ७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता दिल्ली येथील राष्ट्रवादी कार्यालयात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून या बैठकीत पक्षातंर्गत होणार्‍या निवडणूका कार्यक्रम आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व विशेष निमंत्रित आणि कार्यकारिणी सदस्य जे मंत्री आहेत त्यांना पाचारण करण्यात आले आहे.

दरम्यान या बैठकीत युपीए किंवा ममता बॅनर्जी हा मुद्दा नसून फक्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!