---Advertisement---

शेतकरी संघटनेचे बसवंतराव पाटील यांचे निधन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : गोगांव येथील जेष्ठ शेतकरी तथा शेतकरी संघटनेचे नेते बसवंतराव पाटील यांचे वृद्धपकाळाने पहाटे ५ वाजता निधन झाले. अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते सतत लढा देत असतं. शेतकऱ्यांना लाईट बिल माफ,  शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालयास टाळे ठोको आंदोलन केले होते.

सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहायचे. सहकार व सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा अभ्यास होता.रोजगार हमी योजना शेतामध्ये राबविण्यासाठी त्यांनी अनेक मोर्चा आंदोलन केले होते. गोगांव येथे बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय माध्यमातून वाचकांना पुस्तक , वृत्तपत्र वाचण्यास उपलब्ध करून देणारे पाहिले व्यक्ती आहेत .

पाटील यांच्या जाण्याने गोगांवसह तालुक्यातील सहकार व सामाजिक क्षेत्रात भरून न निघणारी उणीव असल्याचे प्रतिक्रिया उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी, तीन मूले, चौदा नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!