---Advertisement---

जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Follow Us:
---Advertisement---

जम्मू कश्मीर : जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चंदगम भागात आज बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यां पैकी एक जण हा पाकिस्तानी दहशतवादी होता. घटना स्थळावरून भारतीय जवानांनी दोन M-4 कर्बाईन आणि 1 एके रायफल जप्त केली आहे.

पुलवामा जिल्ह्यातील चंदगम भागातील एका घरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्या नंतर पोलीस व जवानांनी या भागात शोध मोहिम सुरू केली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्याना कंठस्नान घातला. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यातील दोन दहशतवादी हे स्थानिक रहिवाशी आहेत तर एक पाकिस्तानी दहशतवादी आहे अशी माहीती सुत्रांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!