---Advertisement---

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे थेट ‘एलोन मस्क’ ला महाराष्ट्रात येण्याचे जाहीर आमंत्रण

Follow Us:
---Advertisement---

मुंबई दि. १६ जानेवारी – सुप्रसिद्ध टेस्ला कारचे मालक एलोन मस्कला महाराष्ट्रात येण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन जाहीर आमंत्रण दिले आहे. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असंही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुप्रसिद्ध टेस्ला कारचं लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षण आहे. ही कार भारतात कधी लाँच करणार असा प्रश्न ट्विटरवरील एका युजरने एलोन मस्कला विचारला त्यावर काही शासकीय नियमांच्या अडचणींचा सामना करत असल्याचे मस्क याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे, तुमच्या उभारणीसाठी तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असं म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एलोन मस्कला महाराष्ट्रात आमंत्रित केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!