काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सलगर येथे ५५ जणांचे रक्तदान
शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
अक्कलकोट,दि.२५ : अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे संपूर्ण तालुक्यातुन प्रतिसाद मिळाला.अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना गावोगावी कार्यकर्त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले. यानिमित्त सलगर येथे ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ कुंभार मित्र परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात
५५ जणांनी रक्तदान केले.याचे उद्घाटन दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, युवा नेत्या शितलताई म्हेत्रे
यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना युवा नेते काशिनाथ कुंभार यांनी तालुक्यात शंकर म्हेत्रे हे दिलदार नेते म्हणून ओळखले जातात.नेहमी त्यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांचा गराडा असतो त्यांनी दिलेल्या ताकदीच्या जोरावरच आम्ही काम करत असतो,असे ते म्हणाले. यावेळी युवा नेते रमेश डोंगराजे,भीमाशंकर जमादार,रफिक पटेल,अशोक वरदाळे,सिद्धाराम गोगांव, विजयकुमार डोंगराजे,सागर फुलारी, विश्वनाथ गुंडरगी, काशिनाथ चिकमळ, गुरुनाथ कालिबत्ते, नजीर बिराजदार, सिद्धाराम धसाडे,काशिनाथ कणगी,
आसिफ पटेल आदींची उपस्थिती होती.दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,मोफत आधार कार्ड नोंदणी शिबीर पार पडले.हा कार्यक्रम देखील सभापती म्हेत्रे यांच्या हस्ते पार पडला.सलगर येथे अशोक धोनी मित्र परिवाराकडून वह्या वाटप करण्यात आले.अक्कलकोट शहरात नगरसेवक सद्दाम शेरीकर
यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले.यावेळी रामा गद्दी,मुबारक कोरबू,मैनोद्दीन कोरबू,अशोक वरदाळे,प्रवीण शटगार,रफिक पटेल,युवराज शटगार,भिमण्णा जमादार,सिध्दाराम गोगावे,उमेश डोंगराजे,शाकीर पटेल,इफ्तेकार शेख,अजीम शेरीकर,
असद फराज,नावेद नागनाळीकर आदी उपस्थित होते.