---Advertisement---

राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण – उद्योग मंत्री उदय सामंत

Follow Us:
---Advertisement---

मुंबई दि. १ : राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून राजकारण विसरून राज्य एकसंघ काम करित आहे, असे चित्र निर्माण करण्याचे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. राज्यातील गुंतवणूकी संदर्भात आज आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. सामंत पुढे म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन, सिनारमस, सॅफ्रॉन या कंपन्यांची गुंतवणूक राज्याबाहेर गेली असल्याचे आरोप होत आहेत. याबाबतच्या वस्तुस्थितीबाबत महामंडळाने यापुर्वीच खुलासा केलेला आहे. आवश्यकता पडल्यास याबाबत श्वेतपत्रिका जाहीर केली जाईल. ज्या प्रकल्पाला स्थानिकांचा पाठिंबा असेल असे प्रकल्प लवकर सुरु करण्यात येतील.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणातंर्गत रांजणगाव (पुणे) येथे २९७.११ एकरमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारने मान्यता दिली असून असे अनेक प्रकल्प केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यात येतील. अधिकाधिक प्रकल्प राज्यात यावेत आणि युवापिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यावर आमच्या शासनाचा भर असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!