---Advertisement---

संतापजनक..! नाशिकच्या ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात ५ मुलींवर अत्याचार

Follow Us:
---Advertisement---

नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमातून संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी या आश्रमात राहणाऱ्या एका मुलीने अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान पाच मुलींवर अत्याचार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

या आश्रमाचा संस्थाचालक संशयित हर्षल मोरे याने सहा मुलींवर अत्याचार केल्याचं उघडकीस आले आहे. आधार आश्रमात शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीवर आश्रमाच्या संस्थाचालक संशयित आरोपी हर्षल मोरे याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली. पीडित सहा मुलींपैकी पाच मुली अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १५ मुलींचे जबाब नोंदवले आहेत.

नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील द किंग फाउंडेशन संचलित आधार आश्रमात शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीवर आधार आश्रमाच्याच संचालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात असलेल्या या अनाथ आश्रमात गोरगरीब आणि बेघर मुलं आणि मुली निवासी म्हणून वास्तव्य करतात. मात्र याच गरिबीचा फायदा घेत या संस्थेच्या संचालकाने या संस्थेत वास्तव्यास असलेल्या एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!