---Advertisement---

श्रद्धा वालकर हत्याकांड सारखे मन सुन्न करणारी आणखीन एक घटना आली समोर, रागाच्या भरात मुलाने केले वडिलांचे ‘’इतके’’ तुकडे

Follow Us:
---Advertisement---

बागलकोट : कर्नाटकात एका क्रुरकर्मा मुलाने लोखंडी रॉडने आपल्या वडिलांची हत्या केली. त्यानंतर जन्मदात्याच्या शरीराचे ३२ तुकडे करून शेतातील बोअरवेलमध्ये टाकले. ही घटना बागलकोट जिल्ह्यात घडली. जेव्हा बोरवेलमधून शरीराचे तुकडे मिळाले तेव्हा हत्येचा खुलासा झाला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कर्नाटक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विठ्ठल कुलाली याने रागाच्या भरात वडील परशुराम कुलाली (५३) यांची लोखंडी रॉडने हत्या केली. ही घटना ६ डिसेंबर रोजी कर्नाटकमधील बागलकोटमध्ये घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीच्या मनाला पाझर फुटला नाही. त्याने जन्मदात्या वडिलांच्या शरीराचे ३२ तुकडे केले व ते तुकडे शेतातील खुल्या बोअरवेलमध्ये टाकले.

पोलिसांनी सांगितले की, परशुराम नेहमी दारूच्या नशेत आपल्या दोन मुलांपैकी छोट्या मुलगा विठ्ठल याला शिव्या देत होता. परशुराम यांची पत्नी आणि मोठा मुलगा वेगळे राहतात. मागील मंगळवारी विठ्ठलला वडिलांनी शिव्या दिल्याने राग आला. त्यानंतर त्याने लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत टाकले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!