---Advertisement---

भरधाव कारच्या धडकेत घोडा जागीच ठार

By team
On: December 9, 2023 11:20 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

देवदर्शन करून तुळजापूरकडून सोलापूरकडे येणाऱ्या भरधाव कारने रस्त्यात आडवा आलेल्या घोड्याला जोराची धडक दिल्याने घोडा जागीच ठार झाला. गाडीच्या समोरील इंजिन बाजूचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. ही घटना शुक्रवार, १५ डिसेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील प्रमोद पाटील हे आपल्या कुटुंबासह एम.एच.०९ जी.एफ. ५७९६ या क्रमांकाच्या कारमधून तुळजापूर आणि अक्कलकोट दर्शनासाठी आले होते. शुक्रवारी अक्कलकोटकडे निघाले असताना हगलूर गावानजीक दर्शन ढाब्याच्या जवळ एक घोडा अचानक रस्त्यात वेगाने आडवा आला. गाडीचा स्पीड असल्याने घोड्याला जोराची धडक बसून घोडा फरपटत ५० फूट पुढे जाऊन निपचित पडला. कारचालकाने प्रसंगावधान राखत एअर बॅग उघडली. त्यामुळे कारमधील कोणालाही हानी पोहोचली नाही. कर्नाटक राज्यातील विजापूरजवळ राहणारी एक महिला शेळ्या चालण्यासाठी घेऊन जात होती. त्या टोळीत हा घोडा होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!