---Advertisement---

शेतीच्या वादातून वृद्धाचा खून : आरोपी शीर घेवून फरार !

By team
On: December 12, 2023 9:22 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

शेतीच्या वादातून भावकीतील चौघांनी कुन्हाडीच्या साहाय्याने मुंडके छाटून वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. माढा तालुक्यातील शेवरे शिवारातील कुरणवस्ती येथे सोमवारी (दि. ११) सकाळी साडेदहाच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान, मृताचे शिर घेऊन आरोपी पसार झाले. शंकर प्रल्हाद जाधव (वय ६५, रा. कुरणवस्ती, शेवरे, ता. माढा) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव (दोघे रा. कुरणवस्ती, शेवरे, ता. माढा) आकाश बाबासाहेब जाधव (रा. खताळवस्ती, शेवरे, ता. माढा) आणि अजित बाबासाहेब जाधव (रा. कुरणवस्ती, शेवरे, ता. माढा, सध्या रा. संगम, ता. माळशिरस) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नरहरी नवनाथ बंडलकर (रा. शेवरे) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शंकर जाधव हे तीन दिवसांपूर्वी डोळ्यांचे ऑपरेशन झाल्याने सोमवारी सकाळी घरी एकटेच झोपले होते. या वेळी भावकीतील चौघांनी त्यांच्या घरी जाऊन कुन्हाडीने त्यांच्या गळ्यावर वार करत त्यांचे मुंडके धडावेगळे केले. एवढ्यावरच न थांबता आरोपी त्यांचे मुंडके सोबत घेऊन गेले आहेत. अमानुष व क्रूर पद्धतीने खून केल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जोग तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!