---Advertisement---

धुक्यामुळे तिहेरी अपघात : ८ ठार तर अनेक जखमी !

By team
On: December 28, 2023 9:43 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ८ ठार तर अनेक जण जखमी झाले. उन्नाव जिल्ह्यात आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवर बुधवारी पहाटे कंटेनर ट्रकला ३ बस व २ कारने पाठीमागून धडक दिल्याने एक ठार तर १५ जण जखमी झाले. दरम्यान, पहाटे ३ वाजेच्या सुमारास आग्रा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील शाहदरा पुलावर एक डझनहून अधिक वाहने एकमेकांना धडकल्याने १ ठार तर ६ जण जखमी झाले.

या अपघाताचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला असून त्यात एका अपघातग्रस्त पिकअप वाहनातील कोंबड्या पळवण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याचे दिसते. बरेली जिल्ह्यातील हफिजगंज क्षेत्रात भरधाव ट्रॅक्टरने एका दुचाकीला धडक दिल्याने दोन महिला ठार झाल्या. बागपत जिल्ह्यात व्हॅन व ट्रक अपघातात व्हॅनमधील २ महिला ठार तर ११ जण जखमी झाले. प्रयागराज जिल्हयात एका ट्रकने दुचाकीला चिरडल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!