---Advertisement---

एक्सेल तुटल्याने बस उलटली : २२ प्रवासी जखमी !

By team
On: December 29, 2023 11:14 AM
Follow Us:
---Advertisement---

अहमदनगर : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील संगमनेर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस पिंपरणे गावाच्या शिवारात आली असताना धावत्या बसचे एक्सेल तुटले, त्यानंतर बस उलटून झालेल्या अपघातात बसमधील ४८ प्रवाशांपैकी २२ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये सर्वाधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असून वाहक-चालक हेदेखील जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातील लहान पुलाजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर आगाराची संगमनेर म्हैसगाव ही बस सोमवारी संध्याकाळी कोळवाडी (ता. राहुरी) येथे मुक्कामी होती. मंगळवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास हीच बस म्हैसगाव-संगमनेर अशी येत असताना ४८ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास अचानक तिचे एक्सेल तुटल्याने ती उलटली. तेथून अगदीच काही अंतरावर महावितरण कंपनीचे रोहित्र होते. सुदैवाने बस रोहित्राला धडकली नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!