---Advertisement---

आ.कल्याणशेट्टी यांच्याकडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार !

By team
On: January 9, 2024 9:00 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरु केलेला दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. तो सर्वत्र मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्त स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करून साजरा केला.

यावेळी तालुक्यातील विविध विषयावर पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी सचिन बनसोडे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार बाबा निंबाळकर,मारुती बावडे,शिवानंद फुलारी,अरविंद पाटील,प्रशांत भगरे, स्वामीराव गायकवाड, चेतन जाधव, कमलाकर सोनकांबळे,गौतम बाळशंकर, सोमशेखर जमशेट्टी, प्रविण देशमुख , महेश गायकवाड, रविकांत धनशेट्टी, बसवराज बिराजदार, नंदकुमार जगदाळे, रमेश भंडारे,राजेश जगताप,शिवानंद याळवार, शिवानंद गोगांव आदी पत्रकाराचां सत्कार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी राजकुमार झिंगाडे, प्रकाश पाटील, चंद्रकांत दसले , नागेश कलशेट्टी , मल्लिकार्जून आळगी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!