---Advertisement---

जवानांची दमदार कामगिरी : सहा दहशतवादी जेरबंद !

By team
On: January 14, 2024 9:24 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एनएससीएन-आयएमच्या सहा अतिरेक्यांना पकडून त्यांच्या ताब्यातून शस्त्रे व दारूगोळा जप्त केला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोंगडिंगचे पोलिस अधिक्षक डेकियो गुम्जा यांनी सांगितले की, लोंगडिंग शहर आणि नियाउसा दरम्यानच्या भागात निमलष्करी दल आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईदरम्यान गुरुवारी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी नोकनू आणि खासा गावांत अत्याधुनिक शस्त्रास्त्रे दडवून ठेवल्याचे सांगितले. त्यावरून सुरक्षा दलांनी तीन एमक्यू असॉल्ट रायफल, डिटोनेटर्स, मोबाइल फोन व इतर सामग्री जप्त केली, असे ते म्हणाले. याप्रकरणी लोंगडिंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अटक केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, वांगपांग वांगसा (२८), मेजर पानसा (६४), मिकगम (२७), सार्जंट थांगवांग (२९), अलुंग न्गोडाम (३१), जामगांग गंगसा (२७) अशी त्यांची नावे आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!