मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. नुकतेच कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदाराने चक्क पोलिस ठाण्यात गोळीबार केला. हा गोळीबार सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यावर झाला. भाजप आणि शिवसेना एकत्र सरकारमध्ये असताना आमदाराने पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला. या प्रकरणी भाजप आमदारासह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे. आमदार गणपत गायकवाड असे भाजप आमदाराचे नाव असून दरम्यान ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Watch Our Latest Video
कल्याणचे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झाले आहे.
वास्तविक महेश आणि गणपत हे जमिनीचा वाद मिटवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. ते पोलिस अधिकाऱ्याशी चर्चा करत असताना भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्याने महेश गायकवाड यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यातील दोघांना महेश गायकवाड आणि दोन जणांना त्याचा मित्र राहुल पाटील याने मारहाण केली. जखमी गायकवाड व पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी आरोपी आमदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले.









