---Advertisement---

मिथुन चक्रवर्तींना आला ब्रेन स्ट्रोक !

By team
On: February 11, 2024 10:25 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नेहमीच आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारे व बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना यांच्यावर सध्या कोलकाता येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी त्यांच्या छातीत दखत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यांवर उपचार सुरू आहेत. अभिनेत्याला ब्रेन स्ट्रोक आल्याचे सांगितले जात आहे. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे चाहते चिंतेत आले आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. अशामध्ये अपोलो रुग्णालयाने अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारी रोजी सकाळी मिथुन चक्रवर्ती यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपोलो रुग्णालयाने आता त्याच्या प्रकृतीबाबत एक मोठे अपडेट दिले असून अभिनेताला ब्रेन स्ट्रोक आल्याचे सांगितले आहे. अपोलो रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की, ‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना उजव्या बाजूच्या वरच्या आणि खालच्या अंगात कमकुवतपणा वाटत होता. त्यांनी प्रकृतीबाबत केलेल्या तक्रारीनंतर शनिवारी सकाळी 9.40 वाजता कोलकाता येथील अपोलो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभागात आणण्यात आले. अशा परिस्थितीत त्याच्या मेंदूचा एमआरआय, आवश्यक आणि रेडिओलॉजी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अपोलो रुग्णालयाने आपल्या निवेदनामध्ये मिथुन चक्रवर्तींच्या मेंदूमध्ये इस्केमिक सेरेब्रोव्हस्क्युलर अॅक्सिडेंट म्हणजेच स्ट्रोक झाल्याचे लिहिले आहे. सध्या अभिनेते पूर्णपणे शुद्धित आहेत. व्यवस्थित आहार घेत आहेत. रुग्णालयाने असे देखील सांगितले की, ‘मिथुन चक्रवर्ती यांचे न्यूरो-फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टसह डॉक्टरांच्या टीमद्वारे पुढील ट्रिटमेंट केली जाईल.’ याआधी, कुटुंबातील सदस्यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबद्दल सांगितले होते की, ‘ते व्यवस्थित आहेत आणि फक्त नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात आले आहेत.’

दरम्यान, अभिनेता मिथुन चक्रवर्ती 73 वर्षांचे आहेत. प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांचे चाहते चिंतेत आले आहेत. अभनेता लवकरात लवकर बरे व्हावेत आणि घरी यावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. याआधी, 2022 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांचा एक फोटोही व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते . त्यावेळी त्यांचा मुलगा मिमोहने वडिलांच्या तब्येतीची माहिती दिली होती आणि वडिलांच्या किडनीमध्ये स्टोन असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!