---Advertisement---

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवीत २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार

By team
On: February 15, 2024 10:22 AM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराच्या नेहमीच घटना घडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. एका २२ वर्षीय तरुणीवर लग्नाचं अमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरात अभिषेक नावाच्या तरूणाने 22 वर्षीय पीडित तरुणीसोबत मैत्री केली. त्यानंतर त्याने तिला लग्न करण्याचं अमिष दाखवलं. त्यानंतर त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या घटनेमुळे परिसरात संतापजनक वातावरण आहे. आरोपी अभिषेकने लग्नाचे आमिष दाखवून 22 वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढले. त्यानंतर तो तिला त्यानंतर कधी मित्राच्या खोलीवर तर कधी शहरातील जालना रोडवरील एका लॉजमध्ये घेऊन जायचा. तेथे तिच्यावर सतत अत्याचार करत होता. पीडिता या घटनेमुळे त्रस्त झाली होती. आरोपीचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक पंजाब शिंदे रा. शिवणी, ता. जि. बीड अशी आरोपीची ओळख आहे.

आरोपी अभिषेक पीडितेवर सतत अत्याचार करत होता. मात्र यादरम्यान पीडित तरूणीने लग्नाबद्दल विषय काढल्यानंतर तो तिला मारहाण करायचा. शिवीगाळ करून त्याने पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली, असं 22 वर्षीय पीडितेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी ॲट्रॉसिटीसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नराधमाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार बीडच्या एका प्रसिध्द हॉटेल आणि लॉजवर घडला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!