---Advertisement---

एसटी-ट्रक भीषण अपघातात ४ ठार, ३४ प्रवासी जखमी

By team
On: May 1, 2024 10:34 AM
Follow Us:
---Advertisement---

चांदवड : वृत्तसंस्था

मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एसटी बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन ४ जण ठार झाले, तर ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन तरुण, एक पुरुष, तर एका महिलेचा समावेश असून, जखमींपैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

जळगावकडून वसईकडे ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी वसई आगाराची एसटी बस (क्र. एमएच १४ केयू ३६३१) ही मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल ग्रीन व्हॅलीजवळ ट्रकला (क्र. ओडी ०५ झेड ००४५) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अचानक ट्रकने लेनकटिंग केल्याने बसची ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, एसटी बसच्या डाव्या बाजूचा पत्रा अर्ध्या भागापर्यंत कापला जाऊन बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्यामुळे बसमधील साई संजय देवरे (१४, उमराणे), बळीराम सोनू आहिरे (७१, डिसुझा कॉलनी, नाशिक), सुरेश तुकाराम सावंत (२८, डोंगरगाव, ता. देवळा) हे गंभीर जखमी झाल्याने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. खालिदा गुलाम हुसेन (६०, भिवंडी) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!