---Advertisement---

सोलापुरात प्रणिती शिंदे पहिल्या फेरीत आघाडीवर

By team
On: June 4, 2024 10:11 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापुर : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीचे आज मतमोजणी सुरु असून सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात झाली. दरम्यान सकाळी सात वाजून 58 मिनिटांनी स्ट्रॉंग रूम उघडण्यात आल्‍या. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून टपाली मतदानाने मतमोजणीस प्रारंभ झाला.

सोलापूर लोकसभेसाठी पहिल्या फेरीत काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी अडीच हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर माढा लोकसभा फलटण वगळता पहिल्या फेरी अखेर पाच मतदार संघातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. धैर्यशील मोहिते पाटील पहिल्या फेरीत अखेर 8500 मताची आघाडी घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!