---Advertisement---

सोलापुर जिल्ह्यात ‘हा’ अलर्ट जारी

By team
On: June 12, 2024 9:29 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झालं आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माढा बार्शी या भागात आज रात्री अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छ. संभाजीनगर आणि जालना वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!