ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाविकांसाठी आनंदाची बातमी : पंढरपूरमध्ये मिळणार अल्पदरात ‘या’ सुविधा

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरातील लाखो भाविक पंढरपूर येथे नेहमीच दर्शनासाठी येत असतात याच भाविकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सर्व विठ्ठल भक्तांसाठी मंदिर समितीकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. यासाठी मंदिर समितीकडून हॉटेल ताब्यात घेण्यात आले आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.

विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने उभारलेले विविध भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो. या विविध भक्तनिवासांमध्ये असलेल्या 364 रुममध्ये जवळपास रोज 1500 भाविकांच्या निवासाची सोय होऊ शकते. यामध्ये भाविकांना चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी या हॉटेलचा ठेका देण्यात आला होता. मात्र, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.

कालपासून मंदिर समितीने हे हॉटेल ताब्यात घेतले आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून आहेत. मंदिर समितीने चहा, कॉफी, दूध आणि नाश्त्याच्या दरात निम्म्याने कपात केली आहे. तर जेवणाची थाळी केवळ 100 रुपयात ठेवल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या भक्तनिवासमध्ये वर्षभरात देशभरातून तीन लाखापेक्षा जास्त भाविक निवासासाठी येत असतात.

आज पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दाखल होणार आहेत. त्यासाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पिंपरी चिंचवड येथून रविवारी दुपारनंतर पुण्यात दाखल होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!