---Advertisement---

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथे ‘स्वामी आणि मी’ हा उपक्रम

By team
On: July 7, 2024 2:58 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ सेवा सार संघ पुणे यांच्यावतीने गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून स्वामी भक्तांसाठी खास स्वामी आणि मी या ज्ञानरूपी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि. २० व रविवार दि.२१ जुलै रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वामींविषयी ज्ञान घेऊन स्वामींच्या आशीर्वादास पात्र राहण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वामी वृंदावन दास यांनी दिली.

स्वामी आणि मी या उपक्रमाचे केंद्रस्थान म्हणजे उपस्थित स्वामीभक्त आणि स्वामींच्या अधिक जवळ जाता यावे यासाठी स्वामी विषयीचा प्रश्नसंच उपस्थितांकडून सोडवून घेण्यात येणार आहे. तिथेच प्रत्येकाच्या शंकांचे समाधान देखील करण्यात येणार आहे. या वर्गात उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाप्रसाद देण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट येथे हा उपक्रम होणार असून या उपक्रमास वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे सहकार्य मिळत आहे. उपस्थित राहून स्वामींची कृपा करून घ्यावी,असे आवाहन  श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्यावतीने करण्यात आले आहे. स्वामी सेवा सार संघाच्यावतीने आत्तापर्यंत गुरुपौर्णिमा, श्री दत्त जयंती आणि श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी स्वामी  आणि मी हा उपक्रम होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!