---Advertisement---

भाविकांसाठी आनंदाची बातमी : आता श्री विठ्ठलाचे दर्शन २४ तास राहणार सुरु

By team
On: July 8, 2024 9:45 AM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर : वृत्तसंस्था

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. दरम्यान रविवार, ७ जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे. श्रींचा पलंग काढण्यात आला असून, विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे.

आषाढी एकादशी सोहळा बुधवार, १७ जुलै रोजी होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होत असताना अनेक वारकरी हे श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन वारीत सहभागी होत आहेत. त्यामुळे पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली असून, श्री विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. २६ जुलै (प्रक्षाळपूजा) पर्यंत २४ तास दर्शन उपलब्ध असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!