---Advertisement---

युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचा राजीनामा

By team
On: July 12, 2024 2:18 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा दिला आहे.पदावर असताना पाटील यांनी युवकांना सोबत तालुक्यातील युवा फळी एकत्र संघटित करून तालुक्यात मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या काँग्रेस पक्षला ऊर्जा निर्माण करण्यासाठी रात्र दिवस लोकाचे काम करत सतत जनतेत वावरणारे, युवक काँग्रेसचा एक लिंगायत चेहरा,युवक नेतृत्व म्हणून बाबासाहेब पाटील तालुक्यात सगळीकडे परिचित आहेत.

तालुक्यातील युवक व काँग्रेस प्रेमी तरुणानी भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून बाबासाहेब पाटीलकडे पाहत असतानाच अचानक तालुकाध्यक्ष पदाचा राजनामा दिल्यामुळे  सध्या तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.अक्कलकोट तालुक्यामध्ये युवकांची एक फळी निर्माण करून काँग्रेसला पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील, आंदोलन, युवकांचे प्रश्न हिरिरेने मांडणारे युवा नेतृत्व असलेले सलगर जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव चर्चेत आहे.बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा देत असताना वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे कबूल करून यापुढेही काँग्रेस हाच माझा पक्ष आणि सिद्धाराम म्हेत्रे हेच आमचे नेते असल्याचे सांगितले आहे परंतु तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये बाबासाहेब पाटील यांच्या राजीनामाची चर्चाला मात्र सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!