---Advertisement---

मोठी बातमी : दोन्ही आरक्षणासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

By team
On: July 22, 2024 3:47 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरु असून दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे देखील उपोषणाच्या पवित्रा देत असतांना नुकतेच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. सह्याद्रीवर या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे की नाही? याबाबत शरद पवारांसह ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट कराव्यात, असे आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केले होते. तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देखील मराठा आरक्षणावरुन शरद पवार यांच्यावर टिका केली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या संदर्भात त्यांनी भूमिका प्रश्न करण्याची मागणी महायुतीच्या नेत्यांनी केली होती. तसेच अमित शहा यांनी देखील काल शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत ते काय भूमिका मांडतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषणाचा नारा दिलाय. त्यामुळे दोन्ही बाजूंनी निर्माण झालेल्या या वादावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले आहेत. या भेटीत आरक्षणावर चर्चा केली जाणार असून मुख्यमंत्री त्यानंतर काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!