---Advertisement---

माजी राज्यपाल शिवराज पाटलांच्या हस्ते गहिनीनाथ महाराज औसेकर यांना रोटरी सेवा गौरव सन्मान

By team
On: July 29, 2024 2:38 PM
Follow Us:
---Advertisement---

लातूर  : प्रतिनिधी

लातूर येथील रोटरी क्लब यांच्या वतीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना रोटरी सेवा गौरव सन्मान भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते देवून शानदार सोहळ्यात गौरवण्यात आले औसेकर महाराज यांना रोटरी क्लब कडून मिळालेल्या सेवा गौरव सन्मानाचे भाविक ,शिष्य वर्गाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

ह भ प औसेकर महाराज यांची अध्यात्मिक क्षेत्रात ५० वर्ष सेवा

औसा जिल्हा लातूर येथील नाथ संस्थान चे सद्गुरू ह.भ.प गहिनीनाथ महाराज यांनी गेल्या पन्नास वर्षापासून आध्यात्मिक क्षेत्रात किर्तन, प्रवचन च्या माध्यमातून समाज प्रबोधनचे कार्य केले आहे तर राज्य शासनाच्या पंढरपूर येथील विठ्ठल रूकमिणी मंदिर समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष या पदावर कार्य करताना विठ्ठल रुक्मिणी मंदिरास प्राचीन रूप प्राप्त करून देत विकासाचा चेहरा मोहरा बदलत अध्यात्मिक क्षेत्रात तेथील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे याचा भाविक भक्तांना परम आनंद होत आहे अंत्यंत पारदर्शकता ठेवून सूक्ष्म नियोजन करत कार्य केले आहे या सेवेचा गौरव म्हणून रोटरी क्लब लातूर यांच्या वतीने हभप गहिनीनाथ महाराज यांचा सन्मान माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर ॲड रूद्रालीताई पाटील, रोटरी क्लबचे पदाधिकारी सी ए सुनिल कोचेटा,ॲड जांबूवंतराव सोनकवडे, महेंद्र जोशी, नानक जोधवानी , श्यामसुंदर मानधना रोटरी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते*

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!