---Advertisement---

वीज मंडळ तांत्रिक कामगार पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध !

By team
On: July 30, 2024 9:06 AM
Follow Us:
---Advertisement---

नागनाथ विधाते : दक्षिण सोलापूर

वीज मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधी करीता नूतन संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली.याच नूतन संचालकांमधून पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. नूतन संचालक तथा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे यांची पतसंस्थेच्या कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यानिमित्ताने अपरिचित सामाजिक संस्था, सोलापूर संस्थापक/अध्यक्ष मयुर गवते व महावितरण औद्योगिक वसाहत कार्यालयातील सहकारी जनमित्र व यंत्रचालक यांच्या वतीने कोषाध्यक्ष सुनिल काळे यांचे अभिनंदन व सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. याप्रसंगी मयुर गवते, धुळप्पा टेळे, निलकंठ कांबळे, गुंडप्पा बनसोडे, नितीन कोळी, अपेक्षा बहादुरे, हिना बागवान आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!