ध्यास विश्वसार्ह बातमीचा

११५ जीप, ३०० दुचाकीच्या माध्यमातून निघाली सोलापुरात शांतता रॅली !

अक्कलकोट : प्रतिनिधी

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या सोलापूर येथील शांतता रॅलीसाठी तालुक्यातून ११५ जीप, ३०० दुचाकीच्या माध्यमातून हजारो अखंड मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. अमोलराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने १ लाख फूड पाकीट आणि पाणी बॉटल सोलापूर रॅलीत वाटप करण्यात आले.

दरम्यान अक्कलकोट शहर व तालुक्यातील हजारो अखंड मराठा समाज बांधवांनी ११५ जीप, ३०० दुचाकीच्या माध्यमातून शहरातील प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज की जय..! संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील आगे बडो..! आरक्षण आमच्या हक्काचे..! आशा घोषणा देत मार्गस्थ झाले. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजयराजे भोसले यांनी सोलापूर रस्त्यावरील विजय बाग येते रॅलीचे स्वागत केले. रॅलीचे समाज बांधवांनी चोक नियोजन केले होते. या रॅलीत हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!