---Advertisement---

मोठी बातमी : घरगुती कामगारांसाठी सरकारची मोठी योजना ?

By team
On: August 8, 2024 3:31 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असतांना राज्य सरकारने आता असंघटित क्षेत्रातील मोलकरणींसाठी देखील सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील योजनेवर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. आहे.

राज्यात तब्बल 10 ते 12 लाख घरगुती कामगार- मोलकरणींची संख्या असल्याची माहिती सरकारच्याच वतीनं जाहीर करण्यात आली असून राज्य सरकारच्या या योजनेंतर्गत स्वयंपाक घरातील कुकरसह 21 भांड्यांचा सुमारे 10 हजार रुपये किमतीचा संच घरगुती कामगार महिलांना देण्याची तरतूद केली जाणार आहे. अशा संचांचं वाटप होणार असल्याची अफवा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांत पसरल्यानंतर एकच गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं. मात्र, संचवाटप केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकरणींनाच होणार असल्याची माहिती मिळताच गर्दी ओसरली. त्यानंतर मोलकरीण म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली.
तसेच एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीची भोजन योजना आणि कामावरील साहित्य संचवाटपाच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरेलू कामगार, मोलकरणींसाठी 10 हजार रुपये किमतीची भांडी-कुंडी, कुकर आदी साहित्याचा संच देण्यात येणार आहे.

दरम्यान, दिवंगत आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री असतानाच 10 लाख घरेलु कामगारांची संख्या असल्याची माहिती विधिमंडळात देण्यात आली होती. त्यावर तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनीही शिक्कामोर्तब केलं होतं. आता 12 ते 13 लाख घरेलू कामगार असून, त्यांत 99 टक्के महिला आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!