---Advertisement---

मल्लिकार्जुन मंदिरासाठी अन्नछत्र मंडळांने दिली ५ लाखांची देणगी !

By team
On: August 13, 2024 4:02 PM
Follow Us:
---Advertisement---
अक्कलकोट  : प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान समितीच्या वतीने श्रावण मासा निमित्य सुरु असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर पुराण कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी सोमवारी भेट दिले.
या प्रसंगी जन्मेजयराजे भोसले यांनी नव्याने उभारत असलेल्या ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर बांधकामास रुपये ५ लाखाची देणगी जाहीर करण्यात आली. या वेळी पुराण समितीस रुपये ११ हजार तसेच उपस्थित दोन स्वामीजीना प्रत्येकी ५ हजार यांच्या सह हार्मोनियम वादक व तबला वादक यांना प्रत्येकी रुपये १ हजार असे रुपये २३ हजाराची देणगी व दक्षणा देण्यात आले. देवस्थान समितीच्या वतीने जन्मेजयराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम म.नि.प्र. बसलिंग महास्वामीजी विरक्त मठ अक्कलकोट व गुरुशांतलिंगेश्वर महास्वामीजी कलहिप्परगी यांच्या दिव्य सानिद्यात संपन्न झाला.
सध्या सुरु असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रगतीपथावरील काम पाहून जन्मेजयराजे भोसले यांनी समाधान व्यक्त करून, देवस्थान समितीच्या कार्यासदेखील शुभेच्छा देण्यात आल्या. पाच लाखांचा धनादेश अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते भेट देण्यात आला.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी, उपाध्यक्ष बसवराज माशाळे, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे काका, सदस्य लाला राठोड, दत्तकुमार साखरे, महेश हिंडोळे, प्रशांत लोकापुरे, शिवकुमार कापसे, राजशेखर हिप्परगी, न्यासाचे लेखा परीक्षक ओंकारेश्वर उटगे, प्रा. आडवीतोटे, प्रा. गंगदे, शिवराज स्वामी, राजू नागुरे, स्वामिनाथ गुरव, विद्याधर गुरव, दिनेश पटेल, मैनुद्दीन कोरबू, सर्पराज शेख यांच्या सह भक्त गण देवस्थान समितीचे पदाधिकारी, सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!