---Advertisement---

अमोलराजे भोसले यांचा होणार ‘सर सन्मान’ पुरस्काराने सन्मान !

By team
On: August 29, 2024 3:17 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी 

येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त विजय उर्फ अमोलराजे भोसले यांना स्टेट इंनोव्हेशन अँड रिसर्च फॉउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ‘सर सन्मान’ या पुरस्कार करिता निवड करण्यात आली आहे अशी माहिती संस्थेचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ व महिला राज्य समन्वयक श्रीमती हेमा शिंदे यांनी दिली.

अमोलराजे भोसले यांना लोक कल्याणसाठी शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात भरीव योगदान दिल्याबद्दल कार्याप्रती कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे वितरण दिनांक ३१ आगस्ट रोजी सकाळी १० वाजता सिंहगड इन्स्टिटयूट सोलापूर येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्स मध्ये होणार आहे. सदर पुरस्कार जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, महाराष्ट्र शासनाच्या “सारथी ” संस्थेचे संचालक अशोक काकडे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व प्रिसीजन फॉउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!