---Advertisement---

खरोखरच त्यांच्या या कार्याला माझा सलाम : पद्मश्री अँड. उज्वल निकम !

By team
On: October 5, 2024 9:09 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या अन्नछत्र मंडळाचे हे कार्य सांगण्यासाठी माझ्याकडे खरोखरच शब्द नाहीत, भोसले पिता-पुत्रांनी स्वामी भक्तांची जी सेवा करत आहेत, खरोखरच त्यांच्या या कार्याला माझा सलाम..! न्यासाच्या या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा..!! अशा शब्दात राज्य शासनाचे प्रमुख सरकारी वकील ज्येष्ठविधीज्ञ व पद्मश्री अँड. उज्वल निकम यांनी मनोगतातून व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत स्वियसायक समीर मुल्ला, चंद्रकांत खाचणे, अतुल लोकरे हे उपस्थित होते.

त्यानंतर त्यांनी मंडळाने यंदापासून सुरु केलेल्या श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाला भेट देऊन श्री तुळजाभवानी माता मंदिरात देवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी जाणता राजा युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगाचा भव्य हालत्या देखावा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस राजेंद्र टाकणे व न्यासाचे सचिव शामराव मोरे, मनोज निकम, संतोष भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, बाळासाहेब पोळ, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अतिश पवार, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!