---Advertisement---

भाजपला दुसरा मोठा धक्का : शरद पवारांनी नेत्यांना घेरले !

By team
On: October 11, 2024 10:21 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे :  वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहुल लागली असून गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता पुणे जिल्ह्यात भाजपला दुसरा धक्का बसणार आहे.

राज्यसभेचे माजी खासदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात दाखल होणार आहेत. काकडेंच्या पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची होती, तीच आता भाजपची झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर दिग्गज नेते भाजपला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठे धक्के बसताना दिसत आहेत. समरजीत घाडगे, हर्षवर्धन पाटील, त्यानंतर आता संजय काकडे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी औपचारिक बैठक करून दसऱ्यानंतर पक्षप्रवेश करणार असल्याचं काकडे यांनी स्पष्ट केलंय.

संजय काकडे यांनी यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. भाजपमध्ये मला सध्या कुठलंही काम नसून नुसतं पदावर राहण्यात काहीच अर्थ नाहीय. त्यामुळे मंगळवारी ते भाजप राज्य उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. माझ्यासोबत पुण्यातील 10 ते 15 माजी नगरसेवक आणि आणि काही माजी आमदार संपर्कात असल्याचा दावा काकडेंनी केलाय.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!