---Advertisement---

महानवमी व विजया दशमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची महापूजा

By team
On: October 13, 2024 4:13 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात नव्याने बांधलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिरात श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, शनिवारी महानवमी व विजया दशमी निमित्त सायंकाळी श्री तुळजाभवानी देवीची महापूजा व आरती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आली. याबरोबरच सीमोल्लंघनाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दरम्यान न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, विश्वंभर पुजारी, संजय कुलकर्णी व सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने महापूजा संपन्न झाले. आरती नंतर उपस्थिताना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जाणता राजा युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगाचा भव्य हालत्या देखावा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

यावेळी न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे, सौरभ मोरे, रोहित खोबरे, अप्पा हंचाटे, गणेश भोसले, बाळासाहेब कुलकर्णी, अशापक काझी, पिंटू साठे, निखिल पाटील, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, वैभव मोरे, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, नामा भोसले, सतिश महिंद्रकर, रोहन शिर्के, पप्पू वाकडे, राजेंद्र काटकर, बाबुशा महिंद्रकर, राजू पवार, प्रसाद हुल्ले, कल्याणी देशमुख, श्रीनिवास गवंडी, स्वामींनाथ बाबर, योगेश पवार, लक्ष्मण बिराजदार, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, विशाल कलबुर्गी, सुमित कल्याणी, तानाजी पाटील, राहुल इंडे, महांतेश स्वामी, चंद्रकांत हिबारे, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, शिवु स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्या सह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!