ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे-पाटलांनी सांगितल्यास बार्शी विधानसभा लढण्यास तयार -राजा माने

जरांगे-पाटील यांच्याशी आंतरवालीत राजा मानेंची चर्चा

आंतरवाली सराटी : प्रतिनिधी

बार्शी विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचे नाव जरांगे-पाटील गोटातून पुढे आल्याची चर्चा सुरु असताना काल मध्यरात्री आंतरवाली सराटी येथील सरपंचाच्या मळा परिसरात राजा माने यांनी मराठा समाजसेवक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली.राजकारण हे आपले कार्यक्षेत्र नाही.तथापि मराठा संपादक म्हणून मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितल्यास बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी राजा माने यांनी दर्शविली.आजवरची त्यांची निःपक्ष व परखड पत्रकारिता आणि बार्शी तालुक्यासंदर्भातील त्यांची भूमिका त्यांनी जरांगे-पाटील यांच्यापुढे मांडली.

यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित असलेले डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे राज्य सचिव व डिजिटल पुणे न्यूजचे संपादक महेश कुगावकर , संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व “द इंडिपेंडंट व्हॉइस”चे संपादक अमोल पाटील यांनी डिजिटल मिडियाच्या राज्यभरातील यंत्रणेची माहिती जरांगे-पाटील यांना दिली.राजा माने यांनी मांडलेल्या भूमिकेसंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेवू ,असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!