---Advertisement---

यशोमती ठाकूर यांचा नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल

By team
On: November 8, 2024 8:39 PM
Follow Us:
---Advertisement---

तिवसा वृत्तसंस्था 

राज्यात विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यात माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी तिवसा मतदारसंघाच्या  कॉंग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली. देवासमोर वाढलेलं ताट खाण्याचं काम माझ्या नणंद बाईने केलं, असं त्या म्हणाल्या. नवनीत राणा यांच्या या टीकेला आता यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

तिवसा येथे पार पडलेल्या सभेत यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांचा समाचार घेतला. यावेळी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या, भाजपने संविधान तोंडलं. दोन पक्ष फोडले. सर्वोच्च न्यायालय म्हणते, आम्ही निकाल देऊ, अरे कधी देणार तुम्ही निकाल? आम्ही एक एक रुपया जमा करून बळवंत वानखडे यांची लोकसभची निवडणूक लढवली. आमची वहिनी वायफळ बोलते, तिने कधी संस्कार पाहिले नाही म्हणून ती अशी बोलते. तुम्ही माझ्या भावाला बोलताय हे लक्षात ठेवा, असं प्रत्युत्तर यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांना दिल.

नवनीत राणा ह्या फ्रस्टेट आहेत. ते त्यांच्या यजमानांना काम करतांना बघतात. बहुतेक ते लोणी यांच्या यजमानांचं आहे की काय? कारण नांदगावपेठमध्ये मेडिकल कॉलेज येणार होतं. ते त्यांनी त्यांच्या जमिनी जिथं आहे, तिथं शिफ्ट केलं. म्हणजे आता मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खातंय? असं वक्तव्य करत नवनीत राणा यांनाच त्यांनी उलट सवाल केला.

 

काय म्हणाल्या नवनीत राणा 

देवासमोर वाढलेलं ताट खाण्याचं काम माझ्या नणंद बाईन केलं. दहा वर्ष मतदारसंघाला मागे नेण्याचं काम त्यांनी केलं. माझी नणंद बाई तीन टर्म पासून तिवसा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी आहे. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!