ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवार गटाला दणका

नवी दिल्ली वृत्तसंस्था 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात राजकीय संघर्ष सुरु आहे. तर सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 

तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून पाळले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर या याचिकेवर ७ नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबद्दल ३६ तासांत वृत्तपत्रांत जाहिरात देण्याचे आदेश दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयात आज (१३ नोव्हेंबर) पुन्हा सुनावणी पार पडली.

 

आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून सामोरं जावं, तसेच शरद पवारांचे फोटो किंवा व्हिडीओ वापरू नये, असे आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. तसेच स्वत:च्या पायावर उभे राहा, असा सल्लाही अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिला. दरम्यान, पुढची सुनावणी आता १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!