---Advertisement---

विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे  स्नेहसंमेलन उत्साहात !

By team
On: January 31, 2025 11:30 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शिवपुरी अक्कलकोट येथे विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. संगीतकार आर डी बर्मन ‘ पंचम ‘  यांच्या संगीतावर आधारित बहारदार नृत्ये नर्सरी ते दहावीच्या मुलामुलींकडून सादर करण्यात आली. सुंदर चाली, स्वर यांनी बांधलेली गीते प्रेक्षकांना सत्तरच्या दशकाचा रोमांचक अनुभव देऊन गेली.

आर डी  च्या व्यक्तिमत्त्वाचे उत्तम सादरीकरण श्रेयस नागठाण या विद्यार्थ्याने केले तसेच अर्धनारीनटेश्वर स्वरूपाचे शास्त्रीय नृत्यातील आविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कमांडो प्रशिक्षणातील  विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कसरती हे नावीन्यपूर्ण होते. या कार्यक्रमासाठी डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले, डॉ. गिरिजादेवी राजीमवाले,शांभवी कल्याणशेट्टी हे प्रमुख अतिथी होते.शाळा प्रमुख गायत्री पारखे, अभिजित स्वामी, निदा इंडिकर, आकांक्षा वाडे , सूरज चव्हाण, गिरीष लोखंडे यांचे  योगदान संमेलन यशस्वी करण्याकरिता लाभले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!